Wednesday, 12 August 2015

कुणी समजून घेत नाही ,
याची खंत कधीच नव्हती,
मीच कुणाशी बोलत नाही ,
व आरोप लोकच करतात .


रानफुलातला प्राजक्तातला फरक त्यांना कळतो
पाखरातला फुलपाखरातला फरक त्यांना कळतो ,
मग हे का कळत नाही त्यांना कि
प्रत्येक माणसाच्या तही फरक असतो


हळवे डोळे नेहमी रडवे नसतात ,
स्वप्न होवून तेही जगत असतात ,
बंध ओठांची माणसे मुळी नसतात ,
त्यांच्याहि  मनात वावटळ असतात .


मी तोंड उघडत नाही,
दाता खाली जीभ येवू नये म्हणून ,
डोळे वर करून पाहत नाही ,
प्रकाशाने दिपून जावू नये म्हणून


  हसत नाही कोणी रडू नये म्हुणुन ,
रडत  नाही कुणी हसू नये म्हणून,
सोबत करत नाही  जाता येत नाही म्हणून ,
थांबून राहत नाही थांबता येत नाही म्हणून
मी तुमच्यातला आहे हे धरून चालू नका ,
वाळीत टाका पण टोचून मारून नका

लेखक/ कवी -वैभव रवींद्र पाटील मो. नं :-+91 87965 45437

(टीप :- या कवितेतील चित्र हे इंटरनेट वरून घेतले आहे )
( आज काल सरकारी शाळेची अवस्था …तरीही सर्व सामान्य मुलांची असलेली शाळेबद्दलची ओढ अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केली आहे .....माझ्या मित्राने केलेली एक छानशी कविता   मला एकदा तरी शाळेत जायचंय  )



किती ही जड असू दे

जबाबदारीच्या  ओझ्यासोबत  

दप्तराच ओझ पाठीवर वागवायच ,

किती हि उकडत असू दे  वातनकुलित ऑफिस पेक्षा पंखे नसलेल्या वर्गात  खिडक्या उघडून बसायचं

मला एकदा तरी शाळेत जायचंय

सरांनी  मारलेला जोराचा फटका

न रडता सहन करून

मला आपला धीटपणा अनुभवायचाय

मला एकदा तरी शाळेत जायचंय

लेखक/ कवी -वैभव रवींद्र पाटील मो. नं :-+91 87965 45437


below attached hard copy of this poem



(माझ्या मित्राने केलेली एक छानशी कविता आपणासाठी इथे वाचण्यास ठेवत आहे …पावसाळा आणि मैत्रीण यांचे नाते जोडण्याच्या त्याने केलेला प्रयत्न हा अतिशय छान पद्धतीने या कवितेतून मांडला आहे .....)


हा पावसाळा मला जड जाणार ,.....

पावसाची पहिली सर येणार
जमिनी वरची माती भिजणार
आणि मस्तपैकी हवेत गंध पसरणार

मग काय?

तिच्या ओल्या केसांतून येणाऱ्या सुगंधाची आठवण येणार

हातांची बोट तिच्या केसांतून फिरण्यासाठी शिवशिवणार

पण मग ती नाही याची जाणीव झाल्यावर

तीच बोट स्वतःच्या केसातून फिरवून एक दीर्घ श्वास घेणार

आणि

शांत बसणार

तुम्हाला सांगतो हा पावसाळा मला नक्कीच जड जाणार

धो धो पाऊस पडणार

तिच्या बरोबर पावसात भिजायची खूप इच्छा होणार

मग काय ?

पावसात जाऊन एकटाच भिजत राहणार

पण मन मात्र  तिच्यासाठीच हुरहुरणार

तुम्हा सांगतो हा पावसाळा मला नक्कीच जड जाणार …।

लेखक/ कवी -वैभव रवींद्र पाटील मो. नं :-+91 87965 45437


(टीप :- या कवितेतील चित्र हे इंटरनेट वरून घेतले आहे )

below attached hard copy of this poem





Monday, 10 August 2015


वेड्या प्रेमिकाचे प्रेम
भरशील का प्रेयशीच्या मनात ,
किती करतो प्रेम
तो वेडा तिच्यावर
जसे कृष्णाने राधावर
दमयनतीने नलावर केले केले प्रेम
विचारा त्यांच्या मनाला
मनाशी मन हृदयाशी हृदय
जुळले होते का तुमचे
कसे केले हे प्रेम तुम्ही
माज्या प्रेयसीला सांगाल का 
कसे करावे प्रेम
तुझ्या पात्रतेचा आहे , नाही
यासाठी तू कृष्णा बरोबर तुलना करशील का ?
तू नक्कीच नाही म्हणणार
हे जाणत असलो मी तरी
मी वेड्यासारखा तुज्यावारच प्रेम करणार ....

लेखक/ कवी -अमोल प्रल्हाद  चव्हाण 9763129640















(टीप :- या कवितेतील चित्र हे इंटरनेट वरून घेतले आहे )



ती

निरागस हसणारी ती ,

तारकांसारखे चमकणारे डोळे ते तिचे ,

अवकाशात्तील चंद्रासारखा चेहरा तिचा ,

मोहित करणारी चाल तिची,

परीकथेतील परीसारखी रचना तिची ,

चंद्राप्रमाणे शीतल असणारा सहवास तिचा ,

लांबसडक काळेभोर केस तिचे

हळूच जावे वाऱ्याने स्पर्श करून,

अशीच स्पर्श करून गेली "ती " मनाला

     लेखक/ कवी -अमोल प्रल्हाद  चव्हाण 9763129640

(टीप :- या कवितेतील चित्र हे इंटरनेट वरून घेतले आहे )
मन

माझ्या मनात प्रश्न दोन
कुणाचा मी ,माझे कोण ?
मनात कोड ,कोड्यात मन ,
मनाच कोड सोडवतो कोण ?
मनातल्या मनी मानायचा
क्षण आनंदाचे ,
मनानच घ्यायचा समजून ,
आयुष्याचा \"पण \"
मनानच ठरवायचा ,
होकार प्रेमाचा
म्हणूनच
मनान ठरवण्यातच
असतो आनंद खरा .........

लेखक/ कवी -अमोल प्रल्हाद  चव्हाण 9763129640














(टीप :- या कवितेतील चित्र हे इंटरनेट वरून घेतले आहे )

Tuesday, 4 August 2015

When i Bought new lenovo A7000 that time taken video of un boxing  and review

Lenovo- A7000 smartphone main specification :-

- 5.50-inch 720x1280 display
-1.5GHz processor
- 2GB RAM
-8-megapixel rear camera.

Very good batery back up

superb movie and picture quality

NO heating problem

No any other phone in this specification range is better than this

but I am not like Camera qaulity when zoom a picture black layer ...can any one suggest me how to resolve this
Steps by steps video of Install CPU, CPU Fan, & Memory on ASUS Motherboard H81M CS for beginner


Monday, 3 August 2015

This video  was taken in rainy session 2011 in my village  I was recorded video  from my samsung mobile and edited with marathi song Chimb bhijlale.