कुणी समजून घेत नाही ,
याची खंत कधीच नव्हती,
मीच कुणाशी बोलत नाही ,
व आरोप लोकच करतात .
रानफुलातला प्राजक्तातला फरक त्यांना कळतो
पाखरातला फुलपाखरातला फरक त्यांना कळतो ,
मग हे का कळत नाही त्यांना कि
प्रत्येक माणसाच्या तही फरक असतो
हळवे डोळे नेहमी रडवे नसतात ,
स्वप्न होवून तेही जगत असतात ,
बंध ओठांची माणसे मुळी नसतात ,
त्यांच्याहि मनात वावटळ असतात .
मी तोंड उघडत नाही,
दाता खाली जीभ येवू नये म्हणून ,
डोळे वर करून पाहत नाही ,
प्रकाशाने दिपून जावू नये म्हणून
हसत नाही कोणी रडू नये म्हुणुन ,
रडत नाही कुणी हसू नये म्हणून,
सोबत करत नाही जाता येत नाही म्हणून ,
थांबून राहत नाही थांबता येत नाही म्हणून
मी तुमच्यातला आहे हे धरून चालू नका ,
वाळीत टाका पण टोचून मारून नका
लेखक/ कवी -वैभव रवींद्र पाटील मो. नं :-+91 87965 45437
(टीप :- या कवितेतील चित्र हे इंटरनेट वरून घेतले आहे )
याची खंत कधीच नव्हती,
मीच कुणाशी बोलत नाही ,
व आरोप लोकच करतात .
रानफुलातला प्राजक्तातला फरक त्यांना कळतो
पाखरातला फुलपाखरातला फरक त्यांना कळतो ,
मग हे का कळत नाही त्यांना कि
प्रत्येक माणसाच्या तही फरक असतो
हळवे डोळे नेहमी रडवे नसतात ,
स्वप्न होवून तेही जगत असतात ,
बंध ओठांची माणसे मुळी नसतात ,
त्यांच्याहि मनात वावटळ असतात .
मी तोंड उघडत नाही,
दाता खाली जीभ येवू नये म्हणून ,
डोळे वर करून पाहत नाही ,
प्रकाशाने दिपून जावू नये म्हणून
हसत नाही कोणी रडू नये म्हुणुन ,
रडत नाही कुणी हसू नये म्हणून,
सोबत करत नाही जाता येत नाही म्हणून ,
थांबून राहत नाही थांबता येत नाही म्हणून
मी तुमच्यातला आहे हे धरून चालू नका ,
वाळीत टाका पण टोचून मारून नका
लेखक/ कवी -वैभव रवींद्र पाटील मो. नं :-+91 87965 45437
(टीप :- या कवितेतील चित्र हे इंटरनेट वरून घेतले आहे )
RSS Feed
Twitter
22:43
Unknown

Posted in
0 comments:
Post a Comment